Mumbai Police Advisory for Holi: १३ मार्च रोजी होळी आणि १४ मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुंबईत शांतता आणि सुरक्षितता राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या उत्सवात इतरांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही गोष्टींचे निर्बंध घातले आहेत. १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या दरम्यान रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंग आणि पाणी फेकता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी वाजवता येणार नाहीत.

मुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी या सूचना जाहीर केल्या आहेत.

बीभत्स गाणी, आक्षेपार्ह घोषणांवर बंदी – सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी वाजवता येणार नाहीत, तसेच आक्षेपार्ह घोषणा देण्यावर पोलिसांनी बंदी आणली आहे.

आक्षेपार्ह चिन्हांवर बंदी – आक्षेपार्ह चिन्हांचे प्रदर्शन करणे किंवा पुतळे बनविणे, इतरांचा अवमान होईल, असे फोटो, फलक किंवा इतर वस्तूंचे जाहिररित्या प्रदर्शन करण्यास बंदी घातली आहे.

पादचाऱ्यांवर रंग किंवा पाणी फेकण्यास बंदी – रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर रंग किंवा पाणी ओतण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फुगे फेकण्यावर बंदी – पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या फेकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवा दरम्यान फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १३५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Story img Loader