मुंबई: बँक खात्याचे केवायसी करण्याच्या बहाण्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून एका भामट्याने तब्बल पाच लाख रुपये लंपास केले. घाटकोपर परिसरात ही घटना घडली असून फसवणूक झाल्यानंतर या अधिकाऱ्याने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलीस दलातील संरक्षण शाखा विभागात कार्यरत असलेले हे अधिकारी घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी इसमाने फोन केला. आपण बँकेमधून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगत त्यांनी बँक खात्याचा केवायसी अद्याप झाले नसल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. त्यानुसार अधिकाऱ्याने केवायसी करण्याची माहिती याला विचारली. यावेळी त्याने तत्काळ केवायसी करून देतो, फक्त मोबाइलवर आलेले ओटीपी सांगा, असे अधिकाऱ्याला सांगितले.

हेही वाचा : देशभरातील घरांच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ ? चटई क्षेत्र निर्देशांकावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची खात्री न करताच त्याला मोबाइलवर आलेले ओटीपी तत्काळ दिले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून २६ हजार रुपये गायब झाले. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी या अधिकाऱ्याच्या दुसऱ्या बँक खात्यातील ४ लाख ५६ हजार रुपये गायब झाले. आशा प्रकारे भामट्याने दोन्ही बँक खात्यातून एकूण ४ लाख ८२ हजार लंपास केले. याबाबत अधिकाऱ्याने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police officer defrauded for rupees 5 lakh cyber criminal in the name of bank kyc mumbai print news css