दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अशा घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी गाजावाजा करत अनेक योजना सुरू केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्यांचा बोजवाराच उडाल्याचे चित्र आहे. पीडित महिलांबाबतची पोलिसी वृत्ती दिंडोशी बलात्कार प्रकरणातही दिसून आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत बलात्काराचे प्रमाण दरमहा सरासरी एक असे आहे.
‘आइस’ गायब
एखादी महिला संकटात सापडली तर त्याची त्वरित माहिती तिच्या कुटुंबियांना व पोलिसांना व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी ‘इन केस ऑफ इमर्जन्सी’ (आइस) ही योजना सुरू केली होती. मोबाइलमध्ये हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची सुविधा होती. मोबाइलमधील ‘आइस अ‍ॅप्लिकेशन’ ही कळ दाबल्यास संबंधित महिला संकटात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना व पोलिसांना मिळेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. मुळात असे काही सॉफ्टवेअर आहे, याची माहितीच महिलांपर्यंत पोहोचली नव्हती. आता पोलीस ‘आइस’च्या धर्तीवर ‘आय वॉच’ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.

Story img Loader