मुंबईत सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी काढले आहेत. मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे ५ पेक्षा अधिक लोकांना बेकादेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे निर्देश काढले आहे. याबाबत त्यांनी एक पत्र जारी केलं आहे. त्यानुसार २८ मे पासून ११ जूनपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी राहतील. शहरातील जनजीवन विस्कळीत करण्याचा, दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक जणांना बेकायदेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असं पत्रात सांगितलं आहे.
यातून लग्नकार्ये, अंत्यसंस्कार, चित्रपटगृहे, नाटक, शाळा, महाविद्यालये, दुकाने, कारखाने आणि विभागीय पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेल्या संमेलनाला आणि मिरवणुकीला सूट देण्यात आली आहे.