मुंबई : आग्रा येथील रहिवासी राम मंदिरावर हल्ला करणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून याबाबत यंत्रणा शोध घेत आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलीस नियंत्रण कक्षाला एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव सोहम पांडे असल्याचे सांगून सोहेल कुरेशी नावाची व्यक्ती राम मंदिरावर हल्ला करणार असल्याचे सांगितले. आग्रा ते मुंबई प्रवासादरम्यान ही माहिती मिळाल्याचे सोहम याने सांगितले. कुरेशी हा आग्रा येथील अदपूतपूर येथील रहिवासी आहे. याशिवाय दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने कुरेशीचा मोबाईल क्रमांक व एका आरपीएफ कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिला. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा