मुंबई : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६ हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १८६९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या हददीत १०८ ठिकाणी नाकाबंदीचे करण्यात आली होती. यावेळी सहा हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.विना हॅल्मेट (१८६९), दुचाकीवर तिघे प्रवास करणाऱ्यांवर (२५५), विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या एकुण १३८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

 तसेच, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २० मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी १५३ वाहने ताब्यात घेण्यात आली. पश्चिम प्रादेशिक विभागाने भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. वांद्रे रिक्लेमेशन, कार्टर रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, तसेच खेरवाडी जंक्शन, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या परीसरात नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकुण ७७ गुन्हे नोंद करत १५३ वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. यापुढे देखील भरधाव वेगाने वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यां विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Story img Loader