मुंबई : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६ हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १८६९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या हददीत १०८ ठिकाणी नाकाबंदीचे करण्यात आली होती. यावेळी सहा हजार ६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.विना हॅल्मेट (१८६९), दुचाकीवर तिघे प्रवास करणाऱ्यांवर (२५५), विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या एकुण १३८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा