मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधींचा घोटाळा केला असा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग आहे असंही ईडीने म्हटलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल केला आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

हे वृत्त आल्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनीही ट्वीट केलं आहे.

“कोविड घोटाळा” उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी “कोविड कफन मध्ये ही कमाई केली. १,५०० रुपयांची बॉडी बॅग (मृतदेह बॅग) ६,७०० मध्ये विकत घेतली. वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा/FIR दाखल. असं ट्वीट किरीट सोमय्यांनी केलं आहे.

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २ हजारांऐवजी ६८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.