मुंबई : मुंबई विमानतळावरील टी-२ (टर्मिनल क्रमांक दोन) येथे दूरध्वनी करून विमानतळावर निळ्या रंगाच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आला होता. त्याप्रकरणी आता खोटी माहिती दिल्याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. विमानतळाच्या तपासणीत सुरक्षा कर्मचार्‍यांना विमानतळ परिसरात काही संशयास्पद आढळले नव्हते. टी-२ येथील अधिकाऱ्यांना शनिवारी सायंकाळी ६ वाजता एका निनावी दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावर एक निळी बॅग ठेवण्यात आली असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापकांना दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देऊन विमानतळ परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली. पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक सहार पोलिसांनाही माहिती देण्यात आली आणि दहशतवाद विरोधी सेलच्या अधिकाऱ्यांनीही विमानतळाला भेट दिली. स्थानिक पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापक विक्रांत हळणकर यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे खंडणीची मागणी; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशिल ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसीटिव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवली आहे. त्यात अशा दूरध्वनींमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. शहरात १५ उपायुक्त, दोन हजार पोलीस अधिकारी व ११ हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशिल ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police registered case against unknown person regarding phone call about bomb kept in bag at mumbai international airport mumbai print news css