मुंबईः वरळीतील तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावटपत्र वायरल झाले असून त्यात राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात धनुष्यबाणाला समर्थन दिल्याचे नमुद करण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरीचाही वापर करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांच्या नावाने एक बनावट पत्र वायरल झाले. या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट स्वाक्षरी असून त्यांनी वरळीत शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा या पत्राद्वारे करण्यात आला होता. यावरून मनसे आणि शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये वादही झाला.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Burglary in Revenue Colony on Jangli Maharaj Road Pune news
पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील रेव्हेन्यू काॅलनीत घरफोडी
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
economic crime branch raided Torres Poisar office in Kandivali
टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर छापे
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र

हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : मतदान केंद्रच बदलले… मतदारयादीतील घोळामुळे दिव्यांग मतदारांना नाहक त्रास

आपण विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे आणि त्याचे दायित्त्व म्हणून हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी वरळीत धनुष्यबाणाला पाठींबा देऊन शिवसेनेला (शिंदे) समर्थन देणार आहे. आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसीत महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या, २० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्यने मतदानाचा हक्का बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्राच्या खाली राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचाही वापर करण्यात आला आहे.

मनसेचे उपविभाग सचिव अक्रुर पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(४), ३५३(२) व १७१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश कुसळे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसळे शिवसेना (शिंदे) माजी शाखाप्रमुख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरळी विभागात हे पत्र वायरल झाल्यानंतर वरळीतील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्याशी संपर्क साथला. त्यानंतर ते पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्या पत्रात राज ठाकरे यांच्या लेटरहेडचाही वापर करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशीच बुधवारी पहाटेपासून हे पत्र वरळी विधानसभा मतदारसंघा, आग्रीपाडा परिसरात वायरल झाले होते. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader