ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून मुंबईतून अपहरण केलेल्या फुल विक्रेत्याला एक महिना डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपीने फुल विक्रेत्याला सांगली व कर्नाटक जिल्ह्यात डांबून ठेवले होते. अपहरण झालेल्या व्यक्तीचीही सुखरुप सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>मुंबईः प्रेयसीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराला अटक

सुनीता काळे यांचा करी रोड येथील मॅरेथॉन फ्युचरेक्स येथील पदपथावर फुले विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे पती रमेश बाबू काळे (३५) यांना १ डिसेंबर रोजी आरोपी बापु प्रल्हाद चव्हाण, विलास प्रल्हाद चव्हाण व एका अनोळखी व्यक्तीने फुलांच्या विक्रीच्या नावाखाली सांगली येथे घेऊन गेले व त्यानंतर त्याला एका खोलीत डांबून ठेवले. आरोपींनी सुनीता काळे यांना दूरध्वनी करून सात लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पतीला सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुनीता काळे यांनी तात्काळ लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. त्यात ऊसतोडणीचे पैसे घेतल्याच्या वादातून हे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच मयुरी चव्हाण व संतोष काळे यांचा त्यात सहभाग आढळला. याप्रकरणाच्या तपासासाठी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दोन पथके तयार केली.

हेही वाचा >>> मेट्रो प्रकल्पांना वेग; भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळे बळकट होणार

एक पथक सांगली व एक पथक कर्नाटकमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी संशयीत संतोष काळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर रमेश काळे यांची एका महिन्यानंतर सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच आरोपी संतोष काळेला याप्रकरणी अटक करण्यात आली. काळे याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात सहभागी इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. प्रमुख आरोपी बापू चव्हाण याने ऊसतोडणीच्या पैशांतील वादातून अनेकांचे अपहरण केल्याची माहिती उघड झाली आहे. चव्हाणविरोधात सांगलीमधील विटा पोलीस ठाण्यातही अपहरणाचा एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात हत्या व अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.