लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः अंमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) मुंबईत राबवलेल्या तीन भिन्न कारवायांमध्ये ४० लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. माहिम पश्चिम येथे दोन ठिकाणी व गोरेगाव येथे ही मोहिम राबवण्यात आली. त्यात १९५ ग्रॅम मेफेड्रोन(एमडी जप्त करण्यात आले.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

वरळी कक्षाने शुक्रवारी गोरेगाव येथील संतोषनगर परिसरात संशयावरून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची किंमत १५ लाख रुपये आहे. तिन्ही आरोपींना अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत एएनसीच्या घाटकोपर कक्षाने माहिम पश्चिम येथील कासालुना इमारतीजवळून ६८ ग्रॅम एमडीसह २४ वर्षीय तरूणाला पकडले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १३ लाख ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी घाटकोपर कक्षात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

आणखी वाचा- मुंबई: तिन्ही मार्गावर उद्या ‘मेगाब्लॉक’

तिसऱ्या कारवाईत वांद्रे कक्षाने सायन-माहिम जोड रस्ता येथून दोन तरूणांना ५२ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १० लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी वांद्रे कक्षात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ (क) सह २२ (क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी २१ व २८ वर्षांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader