मुंबईः निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून नये, यासाठी फरार व विविध गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम मुंबईत राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि परिसरातील मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ३२० जामीनपात्र व ६७४ अजामिनपात्र वॉरंट असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी संवेदनशील ठिकाणे, हॉटेल याठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी तपासणी कक्षही उभे करण्यात आले आहेत.

supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
2 arrested for firing in Theur
थेऊर गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी अटकेत

हेही वाचा : पावसाचा मुंबईला तडाखा! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा, घाटकोपर स्टेशनवर गर्दीच गर्दी

यावर्षी प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही वाढ करण्यात आली असून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाया करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीकडून शांतता भंग होण्याची भीती असल्यास संबंधीत व्यक्तीवर सीआरपीसी १०७ अंतर्गत कारवाई केली जाते. याशिवाय सीआरपीसी कलम ११० व १५१(३) अंतर्गत अनुक्रमे २१५४ व ९१६ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (एमपी) कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत अनुक्रमे ३३, १९३ व ९० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय एपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई केली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. यानुसार संबंधित व्यक्ती आदेशात नमूद केलेल्या जिल्ह्यात वा परिसरात दिलेल्या कालावधीसाठी प्रवेश करू शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा ६८, ६९ तसेच १५१, दंड प्रक्रिया संहिता १०७, १०९,११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाते.

Story img Loader