मुंबई : कफ परेड येथे पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत कफ परेड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी गुलाम मुस्तफा शेख वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेले असता आरोपी शेखने ब्लेड काढले. जवळ आल्यास मारून टाकेन, अशी धमकी दिली.

हेही वाचा : मुंबई: विक्रोळीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पहाटे पूर्ण; पाणीपुरवठा सुरळीत

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
cbi itself files case against own officer in corruption charges
भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त

त्यानंतर शेखने भागवत यांच्या दिशेने ब्लेड फिरवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने ब्लेडने हल्ला केला. त्यात भागवत यांच्या हाताला तीन ते चार जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शेखला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी हत्या, पोलिसांवर हल्ला व अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपीची मानसिक स्थिती ठीक वाटत नसून त्याला उपचारासाठी ठाणे येथील मध्यवर्ती मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader