‘चेन्नई सुपर किंग्ज’चा मालक गुरुनाथ मय्यप्पन सट्टेबाजी कसा करायचा त्याचे भक्कम पुरावे मुंबई गुन्हे शाखेने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिस्तरीय सदस्यांपुढे सादर केले. गुन्हे शाखेने बुधवारी समितीपुढे हे पुरावे सादर केले. यामुळे मय्यप्पनच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिस्तरीय समिती नेमली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेदहा वाजता कुलाबा येथील ताज हॉटेलात या समितीपुढे पुरावे सादर केले. सुमारे अडीच तास चर्चा झाली. यावेळी गुन्हे शाखेने समितीपुढे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही सादर केले. चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरूनाथ मय्यप्पन याचा सहभाग तसेच राजस्थान रॉईल्सच्या खेळाडूंच्या स्पॉट फिक्सिंगमधल्या सहभागाबाबत ही समिती चौकशी करत आहे. आम्ही समितीला आरोपपत्राच्या प्रतीसह गुरुनाथच्या सट्टेबाजीच्या सहभागाचे अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यात दूरध्वनी संभाषणाचा समावेश आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रॉय यांनी दिली. गुरुनाथ कशापद्धतीने संघाची माहिती विंदूला द्यायला ते सुद्धा समितीपुढे सादर करण्यात आले.

Story img Loader