अंधेरी पूर्व येथे ४५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. १२ तासात या गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी लाडू कुमार पासवान या आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या वादानंतर त्याने इंद्रजीत रामप्रकाश पासवान (४५) याचा खून केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा >>> मोठी बातमी! दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई
अंधेरी पूर्व येथील तक्षशीला रस्त्यावरील शिवचंद्र यादव चाळ येथे इंद्रजीत पासवान याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. देवेंद्र पासवान(४२) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलीस दाखल आले असता इंद्रजीत पासवान यांच्या साडूने दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत मूळचा बिहार येथील रहिवासी असून कामाच्या शोधात चार दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. तो मेहूणा लाडूकुमार पासवान व नोकर मिनाज शेख याच्यासोबत राहत होता. राजकुमार पासवान व त्यांचा नोकर शेख दोघेही गणपती दर्शनासाठी मंगळवारी गेले होते. रात्री तेथून परतल्यानंतर वेल्डिंगच्या दुकानाच्या समोर इंद्रजीत रक्तबंबाळ अवस्थेत खुर्चीवर बसला होता. त्यावेळी राजकुमार पासवान, त्यांचा मेहुणा कुठे दिसला नाही. पोलिसांनी शोध घेतला असता दुसऱ्या खोलीत आतून कडी लावून लाडूकुमार लपून बसला होता. त्याचा पोलिसांनी ताब्यात घेतले.
दारूच्या नशेत इंद्रजीतने त्याला शिवीगाळ केली. त्याच्या रागातून त्याने लोखंडी टणकदार वस्तू इंद्रजीतच्या डोक्यात मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून लाडूकुमारला पोलिसानी अटक केली आहे.