आरे, राष्ट्रीय उद्यान, समुद्र यांमुळे प्रदूषण नियंत्रणात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नमिता धुरी
मुंबई : चहुबाजूंनी येणारे प्रदूषित वारे आणि स्थानिक प्रदूषण यांच्या एकत्रित परिणामांमुळे सध्या दिल्लीचा श्वास कोंडला असून शाळा व बांधकामे बंद ठेवण्याची वेळ तेथील प्रशासनावर आली आहे. त्या मानाने मुंबईत मात्र परिस्थिती बरी आहे. मुंबई शहरात असलेले राष्ट्रीय उद्यान आणि किनाऱ्यावरील समुद्र यांमुळे मुंबईचे वायुविजन नैसर्गिकपणे होत असल्याने प्रदूषण नियंत्रणात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तापमान कमी झाल्याने जमीन कमी तापते व त्यामुळे जमिनीलगतची हवा वर ढकलली जाण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या या कालावधीत अधिक तीव्र होते; मात्र मुंबईच्या तुलनेत दिल्लीमध्ये हा प्रश्न अधिक गंभीर आहे. यामागे दोन्ही शहरांच्या भौगोलिक स्थितीतील फरक कारणीभूत आहे. दिल्लीला चहुबाजूंनी भूप्रदेशाने घेरले आहे. याउलट, मुंबईच्या तीन बाजूंना समुद्र असून शहरातच १०३ चौरस किमी क्षेत्रफळाचे राष्ट्रीय उद्यान आणि दोन हजार एकरचे आरेचे जंगल आहे. याचा अनुकूल परिणाम शहराच्या वातावरणावर होत आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंजाब, हरियाणा येथे पिकांचे अवशेष जाळले जातात. त्यातून निर्माण होणारे प्रदूषण वाऱ्यांद्वारे दिल्लीत पोहोचते. यासोबतच स्थानिक प्रदूषणामुळे दिल्लीतील हवेचा दर्जा ढासळतो. युरोपीय देशांकडे निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) दिल्लीत पाऊस पडल्यास हे प्रदूषण वाहून जाते; अन्यथा वाऱ्याचा वेग कमी असल्यास ते साचून राहते.
‘मुंबईला लाभलेले जंगल हवेच्या शुद्धीकरणाचे काम करतेच; शिवाय या भागात डोंगर असल्याने पावसाचे ढग अडवले जातात. तसेच झाडांच्या बाष्पोत्सर्जन प्रक्रियेतून झिरपणारी आद्र्रता आणि जवळपासच्या पाणथळ जागांमधून निर्माण होणारी आद्र्रता यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. परिणामी, मुंबईतील प्रदूषण वाहून जाते. यासाठी समुद्री वाऱ्यांसोबत येणारी आद्र्रताही कारणीभूत असते. पाऊस नसतानाच्या कालावधीचा विचार करता समुद्राच्या जागी मानवी वस्ती, कारखाने असते तर त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका मुंबईला बसला असता’, अशी माहिती इंग्लंडच्या रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी दिली.