मुंबई : ‘सिडबी’कडून (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यात नावीन्यता शहरांची (स्मार्ट सिटी) स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. बदलत्या काळानुसार ‘स्टार्टअप’ धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्यात आला असून, उद्योजकांकडून त्यावर सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्याचे स्टार्टअप धोरण हे देशातील आधुनिक धोरण असेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे ‘सक्षम, नावीन्यपूर्ण व प्रगतीशील महाराष्ट्र’ संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड’ सेंटरमध्ये करण्यात आले होते, त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, देशात आज एक लाख ५७ हजार स्टार्टअप असून, महाराष्ट्र हे त्याचे नेतृत्व करीत आहे. राज्यात सुमारे २६ हजार स्टार्टअप आहेत. महिला व नवउद्योजकांच्या संकल्पनांना वाव देऊन राज्याचा आर्थिक विकास साध्य करण्यात येईल. उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार, धोरणकर्ते, ‘इन्क्युबेटर्स ’, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा…सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागात उपचार सुरू, प्रकृतीत सुधारणा

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मुळे उद्योग कमी वेळेत सुरू होऊ शकतो आणि परवानग्यांमध्ये पारदर्शकता आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उद्योग सुरू करण्यासाठी मुंबई व पुण्यामध्ये पोषक वातावरण असून निधीमध्ये मुंबई आघाडीवर आहे, तर तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे पुणे हे केंद्र आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरेही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि विकासात मोठा हातभार लावत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागातील नवसंकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढविला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्टार्टअपसाठी मोठे योगदान देईल. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही, तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला आहे. तर फडणवीस यांनी राज्यात या विभागाला गती दिली. महाराष्ट्राला स्टार्टअपची राजधानी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा…कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या तिकिट विक्रीबाबत न्यायालय काय म्हणाले?

मंगलप्रभात लोढा, मंत्री राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप असून उद्योगांसाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. शासनाकडून उद्योगांसाठी अनेक संधी व सवलती देण्यात येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असून त्यांचे सक्षमीकरण होत आहे. फाल्गुनी नायर, संस्थापक आणि सीईओ, नायका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai provision of rs 200 crore has made from sidbi for startups in state mumbai print news sud 02