मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडाळा घाटात रखडली आहे. त्यामुळे कार आणि मालवाहतूक चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात १० किलोमीटर लांबच-लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुण्याकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. तसेच, अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृताजन ब्रिजपर्यंत आणि पुण्याच्या दिेशेला खंडाळाकडे जाताना १० किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली आहे.
शनिवार, रविवारी आणि नाताळ अशी सलग सुट्टी आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये, सरकारी कार्यालयानं सुट्ट्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी ( २३ डिसेंबर ) सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.