मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. खोपोलीनजीकच्या बोरघाटात कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कंटेनर बंद पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक ठप्प
सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत
Written by लोकसत्ता टीम
First published on: 16-03-2016 at 08:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune express highway transportation delayed