मुंबई : मुंबई, शिवडीवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३०-३५ मिनिटांत पोहचता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या चिर्ले ते कोन जोडरस्त्याच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या बैठकीत या कामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले असून गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडला कंत्राट देण्यात आले आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे.

अटल सागरी सेतूने नवी मुंबईतील चिर्लेला आल्यास चिर्लेवरून पुढे पुण्याला राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते. हे अंतर बरेच मोठे आहे. त्यामुळे चिर्लेवरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर थेट पोहचण्यासाठी अटल सागरी सेतू हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेण्यात आला आहे. त्यानुसार चिर्ले ते कोन असा ६.५ किमीचा उन्नत जोडरस्ता बांधण्यात येणार आहे. यातील १.५ किमीचा रस्ता पूर्णत: नवीन असणार आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

हेही वाचा : मुंबई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना बेड्या

दरम्यान या निविदेबाबत कार्यकारी समितीने काही अतिरिक्त माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक-दोन दिवसात ही माहिती कार्यकारी समितीला सादर करण्यात येईल. त्यानंतर कंत्राट अंतिम झाल्यावर शिक्कामोर्तब होईल. एकूणच आता कंत्राट अंतिम झाल्यात जमा असल्याने आता पुढील कार्यवाही करत महिन्याभरात उन्नत जोडरस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर कामास सुरुवात झाल्यापासून ३० महिन्यात अर्थात अडीच वर्षात काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे अडीच वर्षाने मुंबई ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अटल सेतूमार्गे ३०-३५ मिनिटात पोहचता येणार आहे. त्यामुळे या जोडरस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्याने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा :मुंबई : मोटरमनचे असहकार आंदोलन मागे

गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडची बाजी

या जोडरस्त्याच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एल अॅण्ड टी, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि पीएन सी इन्फ्राटेक या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. या निविदेत अखेर गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडने बाजी मारल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. शुक्रवारी झालेल्या एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निविदा मंजूर करत गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडला कंत्राट बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.