मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गदर्शक कमानी उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी, ९ मे रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गावर विविध ठिकाणी वाहनचालकाना मार्गदर्शक ठरणाऱ्या कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. उद्या आणखी एक कमान उभारण्यात येणार असून त्यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई—पुणे महामार्गाने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.
First published on: 08-05-2019 at 22:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune expressway will close for two hours