मुंबई : मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यूच्या घटना सुरुच आहेत. दोन दिवसांपूर्वी एका कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे. चेंबूर जवळ एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळला असून कोल्ह्याचा मृत्यू रेबीजची लागण होऊन झाला आहे. मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

मागील दोन महिन्यांत चेंबूर परिसरात रेबीजमुळे दोन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुरुवारी याच परिसरात आणखी एका सोनेरी कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला आहे. याअगोदर झालेले मृत्यू हे रेबीजमुळेच झाले असल्याने मृत कोल्ह्याचे नमुने रेबीज चाचणीसाठी देण्याचे तज्ज्ञांनी सुचविले. रेबीज चाचणीच्या अहवालातून मृत पावलेल्या सोनेरी कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. तर तिसऱ्या कोल्ह्याचा मृत्यूही रेबीजमुळे झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, वनविभाग यांच्याकडून भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.ए.आर.सी) आणि आसपासच्या परिसरात मॅपिंग सुरु केले असून, सोनेरी कोल्ह्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग करण्यास देखील सुरुवात केली आहे.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द

हेही वाचा – देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव! हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड

ठाण्याचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ, सोनल वळवी, ज्ञानेश्वर रक्षे तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या नेहा पंचमिया, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांचा समावेश आहे. वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

याआधी ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने मृत कोल्ह्याच्या मेंदूचे नमुने मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. चाचणीच्या अहवालानुसार या कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुंबईत रेबीजमुळे वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात जखमी कोल्हा आढळून आला होता. कोल्ह्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या एकंदर हालचालीवरुन त्याला रेबीजची लागण झाल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. तसेच या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर देखील हल्ला केला होता. या कोल्ह्याला देखील रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते. ही मुंबईतील दुसरी घटना होती.

Story img Loader