कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.००
कुठे : ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर
परिणाम : सकाळी ९.३८ ते दुपारी २.२५ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा नियोजित थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. तर ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान धावणाऱ्या सेवा डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.
या सेवा सर्व स्थानकांवर थांबतील. त्यामुळे सर्व सेवा सर्व स्थानकांवर २० मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ वाजता सुटणाऱ्या सर्व अप जलद मार्गावरील सेवा आपल्या निर्धारत स्थानकाव्यतिरीक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी आणि पोहोचणारी सर्व सेवा १० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

हार्बर रेल्वे
कुठे : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी व माहिम अप आणि डाऊन, सकाळी ११.०० ते दुपारी ३.४०
परिणाम : सकाळी ११.२१ ते दुपारी ३.४०या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून वाशी, बेलापूर, पनवेलला सुटणाऱ्या सर्व सेवा बंद राहणार आहे. तसेच सकाळी ११.०४ ते दुपारी ३. ४९ या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून अंधेरी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
ब्लॉक काळात पनवेल-कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून विशेष सेवा चालवण्यात येतील. वांद्रे, अंधेरी जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजपर्यंत पश्चिम रेल्वेवर तसेच मुख्य मार्गाने प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे.

Story img Loader