रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य तांत्रिक कामांसाठी रविवार, २३ डिसेंबर रोजी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने धावतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर, कुर्ला ते वाशी दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल. यात हार्बरवरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कुठे- मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११.१० ते दु. ३.४०
  • परिणाम- ब्लॉकमुळे मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या

मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात लोकल गाडय़ा थांबतील. माटुंगानंतर पुन्हा अप धिम्या मार्गावर लोकल धावतील. कल्याणहून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल गाडय़ांनाही दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील लोकल गाडय़ा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे- कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११.१० ते दु. ३.४० वा.
  • परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या अप-डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे

  • कुठे- बोरिवली ते भाईंदर अप व डाऊन जलद मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११ ते दु. ३.००
  • परिणाम- ब्लॉकमुळे विरार, वसई ते बोरिवली अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील लोकल दहा मिनिटे उशिराने धावतील.