मुंबई : मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
हेही वाचा : वास्तुरचनाकार – नियोजनकार शिरीष पटेल यांचे निधन
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर
कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे, ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
पश्चिम रेल्वे
कुठे : वसई रोड – भाईदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत विरार/वसई रोड – बोरिवली/भाईदर स्थानकादरम्यान सर्व धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल.