सीएसटी-कल्याण विशेष महिला गाडी कल्याणच्या पुढे नेण्यास विरोध करणाऱ्या मुंबई रेल प्रवासी संघाने बदलापूर, टिटवाळा येथील महिला प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महिला विशेष गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.
सीएसटी-कल्याण महिला विशेष गाडीलाच कल्याणच्या पुढे बदलापूर आणि टिटवाळापर्यंत नेण्याचे सुतोवाच अलीकडेच मध्य रेल्वेकडून करण्यात आले होते. मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी १५ एप्रिलपासून आणखी एक १५ डब्यांची गाडी सुरू झाली तर त्या गाडीस पाच डबे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. त्यामुळे आणखी एक महिला विशेष सुरू करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि, सध्याची महिला विशेष गाडी बदलापूपर्यंत नेण्यास मुंबई रेल प्रवासी संघाने विरोध केला होता. या भूमिकेमुळे महिला वर्गात संताप उसळला असून काही स्थानकांवर महिला प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम सुरू असल्याचे प्रवासी संघाचे म्हणणे आहे.

Story img Loader