मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, ठाणे पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत कोरडे वातावरण असेल तसेच या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंशादरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर ठाणे , पालघर भागात उष्ण व दमट वातावरण असेल यामुळे नागरिकांना सोमवारी उकाड्याचा सामना करावा लागेल.

हेही वाचा : मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्गाचे पुन्हा हाल, आजही लेटमार्क!

याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा, कोल्हापूर , अहमदनगर, बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान ४०-५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे.