पावसात शहरात पाणी साठू नये यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची यादी महानगरपालिकेकडून दिली जात असली तरी यावर्षीही शहरात ४० ठिकाणी हमखास पाणी साठणार आहे. ही माहितीही पालिकेकडूनच देण्यात आली असून या ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मुसळधार पावसात या पंपांचा फारसा उपयोग होत नसल्याचा अनुभव आहे.
पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यात कोणताही अडथळा राहू नये यासाठी गटारे, नाले यांची साफसफाई सुरू आहे. त्याचप्रमाणे पर्जन्यजलवाहिन्या आणि सखल भागातील पाणी उपसून बाहेर काढण्यासाठी उदंचन केंद्र बांधण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. मात्र या कामांची प्रगती कासवगतीने होत असल्याने या पावसातही मुंबई जलमय होण्याचा धोका कायम आहे. वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लीव्हलॅण्ड उदंचन केंद्र गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी कार्यरत होणे अपेक्षित होते मात्र ती यावर्षीही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी वरळी, महालक्ष्मी, हाजीअली या भाग पुन्हा पाण्याखाली जाणार आहे.
पालिकेने घेतलेल्या आढाव्यानुसार शहरात सुमारे २७० ठिकाणी पाणी तुंबू शकते. त्यातील ४० ठिकाणे तर हमखास पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी दर पावसात पाणी साठण्याचे प्रकार घडतात. दक्षिण भागात वरळी, महालक्ष्मी, परेल, हिंदमाता, पश्चिम उपनगरात अंधेरी विलेपार्ले, पूर्व उपनगरात घाटकोपर, भांडुप येथे सखल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होण्यापासून वित्तहानीपर्यंतचे प्रकार होतात. यापैकी १९१ ठिकाणांसाठी पालिकेने २५३ पंप पुरविले आहेत. गेल्यावर्षी २०० ठिकाणांसाठी २१३ पंप वापरण्यात आले होते. मात्र तुंबलेले पाणी उपसून काढण्यात या पंपांची क्षमता कमी पडली होती. त्यामुळे पालिकेने यावर्षी अधिक पंप पुरवण्याचा निर्णय घेतला. मात्र मुसळधार पावसात त्यांचा कितपत वापर होईल, याबाबत पालिका अधिकाऱ्यांनाच शंका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणी तुंबणारी प्रमुख ठिकाणे
ठाकूर कॉम्प्लेक्स, मिलन सबवे, नवरंग सिनेमा, मोतीलाल नगर, हिंदूमाता जंक्शन, सायन, अंधेरी सबवे, खार सब वे, चेंबूर, इर्ला, दहिसर चौक, गवाणपाडा, एलबीएस मार्ग, ठाकूर कॉम्प्लेक्स, मोतीलाल नगर, नेहरू नगर, किंग्ज सर्कल, काळबादेवी, ताडदेव, वरळी, परेल, कुर्ला, खार रोड, जुहू तारा रोड, गोरेगाव (प), संभाजी नगर, दहिसर, घाटकोपर, भांडुप

पाणी तुंबण्याची ठिकाणे : २७०
हमखास पाणी तुंबण्याची ठिकाणे : ४०
पाणी उपसण्याचे पंप :
 २५३ (१९१ ठिकाणे)

पाणी तुंबणारी प्रमुख ठिकाणे
ठाकूर कॉम्प्लेक्स, मिलन सबवे, नवरंग सिनेमा, मोतीलाल नगर, हिंदूमाता जंक्शन, सायन, अंधेरी सबवे, खार सब वे, चेंबूर, इर्ला, दहिसर चौक, गवाणपाडा, एलबीएस मार्ग, ठाकूर कॉम्प्लेक्स, मोतीलाल नगर, नेहरू नगर, किंग्ज सर्कल, काळबादेवी, ताडदेव, वरळी, परेल, कुर्ला, खार रोड, जुहू तारा रोड, गोरेगाव (प), संभाजी नगर, दहिसर, घाटकोपर, भांडुप

पाणी तुंबण्याची ठिकाणे : २७०
हमखास पाणी तुंबण्याची ठिकाणे : ४०
पाणी उपसण्याचे पंप :
 २५३ (१९१ ठिकाणे)