Mumbai Weather Updates Today, 22 July 2023 : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, कोकणसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रिय स्थिती, तसेच मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील आठवडाभर राज्यात पावसाला पोषक स्थिती असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे शहरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईसह राज्यात आज (२२ जुलै) सकाळपासूनच पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
Mumbai Rain Today Update : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील येनगावजवळून वाहणाऱ्या व आज सकाळपासून दुथडी भरून वाहणाऱ्या जोगेश्वरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसलेच! यामुळे गावात व शिवारातील शेतात पाणीच पाणी झाले आहे. नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
बुलढाणा : जळगाव तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पाऊस व पुराने थैमान घातले असतानाच आता तालुका मुख्यालयात देखील पुराचे पाणी घुसले आहे. किमान शंभर घरात पाणी शिरल्याने भयभीत नागरिकांच्या हाल अपेष्टास पारावर उरला नसल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने मुंबईला हायटाईडचा (भरती) इशारा दिला आहे
मुंबईच्या किनारपट्टीवर ४.१४ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशारा
मुंबईत आज कमी पाऊस असल्याने मोठा फटका बसणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज उपनगरात काही प्रमाणात पाऊस आहे
तर नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुणे लोणवळा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
दृष्यमानता खराब असल्याने वाहनं हळू चालवा
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1682627196933017601?s=20
बुलढाणा : नावातच पूर असलेल्या संग्रामपूर तालुका सध्या कोसळधार पाऊस व रौद्र रूप धारण केलेल्या केदार नदीच्या पुराचा प्रत्ययकारी अनुभव घेत आहे. पुराचे पाणी तीन गावांत घुसल्याने हजारावर ग्रामस्थांनी सुरक्षित जागी स्थलांतर केले असून अनेकांनी छतावर आसरा घेतला आहे.
वर्धा : जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार वृष्टी झाल्याने दैना उडाली आहे. सेलू तालुक्यातील धानोली ते बेळगाव हा लोकवर्गणीतून बांधलेला पूल पुरात वाहून गेला. वाहतूक बंद पडली आहे.हिंगणघाट तालुक्यातील आलमदोह ते अलिपूर मार्ग यशोदा नदीच्या प्रवाहामुळे रात्रीपासून ठप्प पडला.
कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. नद्या, नाल्याना पूर आले. नद्यातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शेतात पाणी घुसले. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके खरडून गेली तर अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे.
वाशीम : शुक्रवार २१ जुलै च्या रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. आज २२ जुलै रोजी सकाळ पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने जिल्हा चिंब झाला असून ६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके धोक्यात आली असून जन जीवन विस्कळीत झाले आहे.
अकोला : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहत असून विद्रुपा नदीला पूर आला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. कारण, या जिल्ह्यांतील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय, मुंबई, ठाणे, रायगड भागात मुसळधार पाऊस
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1682623584295084032?s=20
जळगाव जामोद तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने जोगेश्वरी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीचे पाणी येनगाव गावात घुसण्याची दाट शक्यता असल्याने गावकरी भयभीत झाले आहे.
राज्यात रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी पुणे आणि पालघरला ‘रेड ॲलर्ट’, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिमला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुळे संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिणामी बावनबीर, टूनकी गावांचा संपर्क तुटला असतानाच घरात पाणी घुसले आहे.
चंद्रपूर : मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चंद्रपूरला चांगलेच झोडपले. त्यामुळे एकाच आठवड्यात संपूर्ण चंद्रपूर सलग दुसऱ्यांदा जलमय झाले.शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सर्वदूर पाणीच पाणी साचले होते.
नागपूर : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांसह रत्नागिरी, पालघर आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने “रेड अलर्ट” दिला आहे.
तुफान पावसाला सुरुवात झाली की, आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५च्या स्मृती जाग्या होतात. त्या दिवशी मुंबईतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहात होत्या. सर्वाधिक संकोच झालेल्या मिठी नदीने त्या दिवशी रौर्द्र रूप धारण केले. परिणामी ८५० मुंबईकरांना प्राण गमवावे लागले आणि अब्जोवधींचे नुकसान झाले. विकासकामांच्या भाऊगर्दीत नदीपात्रात केलेले अतिक्रमण आणि तिचे एक तोंड बंद करणे मुंबईकरांच्या अंगाशी आले... म्हणूनच भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी जाणून घेवू या मिठी नदीची ही कूळकथा!
मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुख्य रेल्वेमार्ग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कर्जत/ खोपोली तसेच हार्बर मार्ग (CSMT ते पनवेल- वाशी) ट्रान्स हार्बर (ठाणे- वाशी/पनवेल) तसेच बेलापूर- नेरळ- खारकोपर लाईन या चारही मार्गांवर ट्रेन सुरळीत सुरु आहेत. तर पश्चिम रेल्वेने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे (चर्चगेट- डहाणू) व पश्चिम हार्बर (माहीम- गोरेगाव) या दोन्ही लाईनवरील ट्रेन नियमित वेळेनुसार धावत आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार काही स्थानकांमध्ये ट्रेन १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.