Maharashtra Weather Alert : मुंबईत गेल्या २४ तासांत कुलाबा परिसरात सर्वाधिक पाऊस पडला. त्या खालोखाल सीएसएमटी, नरिमन पॉईंट परिसरात जास्त पाऊस पडला. त्यामुळे चर्चगेट परिसर जलमय झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच बुधवारी संध्याकाळी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. गेल्या २४ तासांत महानगरपालिकेच्या पर्जन्य मापक यंत्रावरील नोंदणीनुसार दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला. कुलाबा, सीएसएमटी स्थानक परिसर आणि नरिमन पॉईंट येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

हेही वाचा… ठाणे – बोरिवलीदरम्यान बेस्ट प्रवाशांचे हाल, ठाणे – मागाठाणे बेस्ट बसचे तीन थांबे वगळले

मुंबईत हवामान विभागाची फक्त कुलाबा आणि सांताक्रूझ परिसरात हवामानदर्शक संयंत्रे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत महानगरपालिकेने तब्बल ६० ठिकाणी अशी स्वयंचलित संयंत्रे उभारली आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी किती पाऊस पडला याची विभागवार माहिती उपलब्ध होत असते. त्यानुसार मुंबईतील ६० ठिकाणांपैकी सर्वाधिक पाऊस कुलाबा परिसरात पडला. दक्षिण मुंबईत जास्त पाऊस पडल्यामुळे चर्चगेट स्थानक परिसरातील रस्ते जलमय झाले होते.

हेही वाचा… मुंबई शहर, उपनगरांत पहाटेपासून संततधार; आज अतिवृष्टी होण्याचा इशारा

कुठे किती पाऊस

कुलाबा २१९ मिमी
सीएसएमटी परिसर १७४ मिमी
नरिमन पॉईंट १७१ मिमी
मरोळ १५९ मिमी
अंधेरी पूर्व १५४ मिमी
जोगेश्वरी १४७ मिमी
माझगाव डोंगरी १३६ मिमी
मलबार हिल १३२ मी मी
ग्रॅन्ट रोड १२८ मिमी
दादर ११४ मिमी
विक्रोळी १२९ मिमी
भांडुप १२५ मिमी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain red alert maximum rain in mumbai in colaba waterlogging at churchgate mumbai print news asj