मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून मुंबई शहर, तसेच उपनगरांत गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर लक्षात घेऊन हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> Mumbai Rain Red Alert : मुंबईत सर्वाधिक पाऊस कुलाबामध्ये, चर्चगेट जलमय
मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मुंबई शहर, उपनगरांत पहाटेपासून संततधार; आज अतिवृष्टी होण्याचा इशारा
बुधवार सकाळी ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगरात पडलेला पाऊस
कुलाबा- २२३.२ मिलिमीटर
सांताक्रूझ – १४५.१ मिलिमीटर
बांद्रा – १०६.० मिलिमीटर
राम मंदिर – १६१.० मिलिमीटर
चेंबूर- ८६.५ मिलिमीटर
भायखळा- ११९.० मिलिमीटर
सीएसएमटी – १५३.५ मिलिमीटर
सायन – ११२.० मिलिमीटर