मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सेंट्रल आणि हार्बर लाईनवरच्या लोकल ट्रेन आज रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकल रद्द केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. सेंट्रल रेल्वेकडून यासंदर्भातलं ट्विटही करण्यात आलं आहे.
जोरदार पावसामुळे सायन-कुर्ला भागात पाणी साचल्यामुळे CSMT- कुर्लादरम्यानची सकाळी ९.५० पासूनची लोकलसेवा खबरदारी म्हणून रद्द करण्यात आली आहे. इतर मार्गांवरची सेवा मात्र सुरु असल्याचं ट्विट मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’

कोणत्या मार्गावरील सेवा बंद, कोणत्या गाड्या रद्द?

  • सकाळी १०.२० पासून CSMT- ठाणे मुख्य लाईनवरची सेवा रद्द करण्यात आली आहे तर CSMT-मानखुर्द हार्बर लाईनवरची सेवाही सकाळी ११.१० पासून बंद करण्यात आली आहे.
  • ट्रान्स हार्बर आणि BSU सेवा मात्र सुरळीत सुरु आहेत. ठाणे आणि कर्जत-कसारा तसंच मानखुर्द- पनवेल दरम्यानची शटल सेवाही सुरु आहे.
  • लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल-
    02362 CSMT- आसनसोल विशेष गाडी – 14.30 Hrs(२ वाजून ३० मिनिटे)
    02598 CSMT- गोरखपूर विशेष गाडी- 15.30 Hrs (३ वाजून ३० मिनिटे)

तर रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे 501L, 502L, 504L, 505L, 506L, 521L, A-60 आणि A-372 या मार्गांवरच्या सकाळी ८.४० वाजल्यापासूनच्या बसेस महाराष्ट्र नगर फ्लायओव्हर ब्रिज मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. बाकीच्या ठिकाणचे मार्ग आहे तेच असतील अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

Story img Loader