मुंबई : शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचलं आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीला या पावसाचा फटका बसला आहे. शहरांतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूक खोळंबली आहे. कित्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे वाहतूक धिम्या गतीने चालू आहे. यामुळे मुंबईकरांना आपलं कार्यालय अथवा कामाचं ठिकाण गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकजण बस आणि लोकलमध्ये अडकले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार आज सकाळी विधीमंडळात पोहोचू शकले नाहीत. त्यांनाही विधीमंडळ गाठण्यासाठी पायपीट करावी लागली. दरम्यान, अवघ्या सहा तासांच्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर टीका होऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने त्यांचं काम चोख न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याची टीका विरोधक आणि नागरिकांकडून होत असतानाच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालिका प्रशासनाचा बचाव केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा