वायू वादळामुळे उशीर झालेला मान्सून अखेर आज मुंबईमध्ये दाखल झाला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणबरोबरच पश्चिम उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच पावसात मान्सूनपूर्व तयारी वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे. अनेकजण विकेण्ड मूडमध्ये असल्याने अनेकांनी या पावसासंदर्भात मिम्स शेअर केले आहेत. अगदी ओला उबेरचे वाढलेले भाडे असो किंवा रस्त्यावरील खड्डे असो सर्वच गोष्टींची नेटकरी मजा घेताना दिसत आहेत. #MumbaiRains हा हॅटशटॅग वापरून अनेकांनी मिम्स पोस्ट केले आहेत. हा हॅशटॅग इतका लोकप्रिय झाला आहे की तो सकाळपासूनच ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये आहे. पाहुयात असेच व्हायरल झालेले मिम्स…

महापालिकेची पहिली प्रतिक्रिया

मुंबईकरांचे कपल गोल्स

आता पावसाचे श्रेय द्या

सॅलरी किती घेणार

हवामान खाते ट्रोलर्सला पाऊस दाखवताना

फिटनेस तपासणार

सावधान राहा

त्यांचा थाट वेगळाच

असा गेलो ऑफिसला

मुंबईकर आणि रिक्षावाले

मुंबईचे वॉटरपार्क

मुंबईकर ऑफिसला जाताना

जगाचा अंत जवळ आलाय

असा एखादा जण तरी असतोच…

‘आमच्या वेळी’वाले काका

पावसाचे चार थेंब पडले आणि…

ते सगळ्यांना नाय म्हणणार

हिंदमाताला पाणी साठले की पावसाळा घोषित करायचा

पहिला दिवस आणि दोन दिवसांनंतर

हिंदमाता महासागर

थोडा पाऊस आणि लगेच…

लोकलचा दरवाजा…

श्रीमंती

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाही मुंबईसहीत राज्यभरामध्ये जोरदार ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडणरा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.