मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.  मुंबई आणि परिसरात बुधवार पासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आणि रात्रभर अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळेच सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. गांधी मार्केट परिसरामध्ये तर एक ते दीड फूटांपर्यंत पाणी साचलं आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Weather forecast for North Maharashtra Marathwada Vidarbha
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार

वडाळ्यामध्येही काही ठिकाणी पाणी साचलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासूनच वीजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामानखात्याने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

पावसामुळे सकाळपासूनच रेल्वेच्या वाहतुकीची गती मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं. कुर्ला- विद्याविहारदरम्यान ट्रॅक्सवर पाणी साचल्याने वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने होत आहे. कुर्ला-विद्याविहारदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. हार्बर मार्गावरील वाहतूकही २०-२५ मिनिटं उशीराने होत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने असली तरी सुरळीत सुरु असल्याचं म्हटलं आहे.

चुनाभट्टी, शीव रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये सखल भागांमध्ये रात्रभर पाऊस पडल्याने पाणी साचलं आहे.

कुर्ल्यामधील लाल बहादुर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील शितल सिनेमाजवळ, शीवमधील रोड नंबर २४, साईनाथ सबवे, चेंबूर फाटक, मलीन सबवे, अंधेरी बाजारपेठ, अंधेरी सबवे, गांधी मार्केट, हिंदमाता, आरसीएफ कॉलनी, वडाळा ब्रीजजवळ रस्त्यांवर पाणी साचल्याने बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबईसहीत उपनगरांमध्ये शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे मुंबईच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांपर्यंत घट झाली.

Story img Loader