अश्लील चित्रफित निर्मितीच्या आरोपांतून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या राज जामिनावर बाहेर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अश्लील साहित्याशी आपल्या कंपनीचा संबंध नाही. शिवाय पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात आपल्याविरोधात कोणताही पुरावा नाही. आपल्या चित्रफितीत काम करण्यासाठी आपण कोणाला धमकवल्याचे दुसऱ्या आरोपपत्रातही कुठेही नमूद केलेले नाही. तपासादरम्यान जमा केलेल्या पुराव्यांतून आपल्याविरोधात सकृतदर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे दिसते, असा दावा राज याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करताना केला आहे.

मुंबई : ‘हॉटेल द ललीत’मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकी प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने राज याच्यासह त्याच्या कंपनीचा माहिती- तंत्रज्ञान प्रमुख रयान थोरपे याला या प्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात अटक केली होती.

सप्टेंबर महिन्यात झाली होती जामिनावर सुटका –

अश्लील चित्रफिती निर्मिती करणे आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून वितरीत करण्याचा प्रमुख आरोप या दोघांवर आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज याने जामिनासाठी अर्ज केला होता. सप्टेंबर महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती.