मुंबई : राज्याप्रमाणेच मुंबईत ऑगस्टमध्ये टजवळपास साधारण ३० टक्के पावसाची तूट आहे. असे असले तरी जुलैमध्ये कोसळलेल्या पावसाने हंगामातील एकूण पावसाच्या ८० ते ९० टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये किनारपट्टी भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे राहिलेल्या पावसाची भरपाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ग्रँड हयात हॉटेलमध्ये ममता बॅनर्जींनी गंध लावण्यास दिला नकार, Video व्हायरल; भाजपाचं टीकास्र!

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता

मुंबईत यंदा २५ जूनला मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच यंदा पूर्वमोसमी पाऊसही मुंबईत फारसा झाला नाही. मुंबई शहर तसेच उपनगरांत देखील मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जूनचा शेवटचा आठवडा मुसळधार पाऊस पडला त्यानंतर जुलै महिना मुसळधार पावसाने गाजवला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जवळपास ७० टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारणपणे कुलाबा येथे ४७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कुलाबा केंद्रात १११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे ऑगस्टमध्ये सरासरी ५६० मिलिमीटर पाऊस होतो, तर यंदा १७७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तरीही हंगामाच्या ८० ते ९० टक्के पाऊस

मुंबई शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत मिळून जवळपास अडीच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३१० मिलिमीटर तर, सांताक्रुझ केंद्रात २७८४ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत आत्तापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १८६८.९ मिलिमीटर म्हणजेच ८०.९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर, सांतांक्रुझ केंद्रात २४९५.७ मिलिमीटर म्हणजे ८९.६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> “आपल्या पक्षात एक कमी आहे, ती आपल्याला…”, राहुल गांधींचं मुंबईत वक्तव्य

दरम्यान, मुंबईत मागील दोन ते तीन दिवसांपासून हलक्या सरींचा पाऊस झाला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३०९.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०२१ मध्ये ३१६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ११२८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

सप्टेंबरमध्ये मुंबईतील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या सप्टेंबरच्या चार आठवड्यांच्या नवीन अंदाजानुसार, सप्टेंबर मध्यापर्यंत पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात पावसाचे आगमन होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात मुंबईतील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

Story img Loader