First Case Of HMPV Found In Mumbai : पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात आज (८ जानेवारी) मुंबईतील ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा पहिला रूग्ण अढळला असून, सहा महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान रुग्णालयाची डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
cidco navi mumbai house rates marathi news
Cidco Homes Price List: नवी मुंबईतल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती अखेर जाहीर; वाचा घरांच्या दरांची परिसरनिहाय यादी!
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्थानिक प्रशासनाला १ जानेवारी रोजी एचएमपीव्ही रुग्णाबाबत कल्पना दिली होती. परंतु परळ येथील बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप असा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

केंद्र सरकारकडून खबरदारी

चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याने, देशातही याला विषाणूला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणी दरम्यान देशातील काहींना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहाणी पथकाची स्थापना केली आहे. हे पथक जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चिनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे.

हे ही वाचा : Torres Fraud: मुंबई, ठाण्यातील ‘टोरेस’ घोटाळा, थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन; आरोपी रशिया व उझबेकिस्तानचे, तर मास्टरमाईंड युक्रेनचा!

२००१ पहिल्यांदा शोध

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. या विषाणूमुळे श्वसनासंबंधी आजार होतात. संशोधनातून असे समोर आले होते की, या विषाणूचा किमान सहा दशकांपासून प्रसार होत आहे. याला आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखले जाते. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना पसरतो. सीडीडी या चिनी संकेतस्थळानुसार ‘एचएमपीव्ही’चा संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.

हे ही वाचा : “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर”; संजय राऊत यांचा गंभीर दावा

एचएमपीव्ही ची लक्षणे

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसमध्येही (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोनासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर चीनच्या अनेक भागांमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) प्रादुर्भाव वाढत आहे.

Story img Loader