मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळला आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत. दरम्यान १९ जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता. झिकाबाधित मुलीला २० ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

हेही वाचा >>> दहीहंडी उत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज

home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
A dog was strangled and killed at an animal shelter Pune news
पिंपरी : सांभाळण्यासाठी दिलेल्या श्वानाला डांबून ठेवून ठार मारले
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…

सार्वजनिक रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी तिला दाखल करण्यात आले आहे. या मुलीला झिका झाल्याचे लक्षात आल्यावर मुंबई महापालिकेने ती राहत असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात कोणताही नवीन संशयित रुग्ण किंवा तापाचा रुग्ण आढळला नाही. रुग्णाच्या इमारतीच्या परिसरात एडीज डासोत्पत्ती आढळली. तेथे डास नियंत्रण उपाययोजना राबविण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’: कशेळी कारशेडच्या कामाला दीड – दोन महिन्यांत सुरुवात

झिका हा रोग हा झिका विषाणूमुळे होणारा सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविड सारखा वेगाने पसरत नाही. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्तींना लक्षणे नसतात. ज्यांना इतर आजार आहेत त्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते.