मुंबई : ‘मतदान करा आणि सवलत मिळवा’ अशा आशयाच्या जाहिरातींनी बुधवारी मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. हॉटेल व्यावसायिक आणि विक्रेते, दुकानदार यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान केलेल्यांनी बोटावरील शाई दाखवल्यास २० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले होते. ठिकठिकाणी देण्यात आलेल्या या सवलतींचा आणि योजनांचा मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत अंदाजे ५०.६७ टक्के मतदान झाले होते, तर राज्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी या उद्देशाने ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे दादर येथील मॅजिस्टिक बुक डेपोनेही मतदान केल्याची बोटावरची शाईची खूण दाखवल्यास आवडत्या पुस्तकांच्या खरेदीवर २० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले होते. तर, मुंबईतील काही स्थानिक विक्रेत्यांनी कपडे, शोभेच्या वस्तू आणि अन्नधान्य खरेदीवर सवलती आणि विविध भेटवस्तू जाहीर करण्यात आल्या होत्या.

Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
ED raids Maharashtra, maharashtra assembly election 2024
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?

हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धारावीत मतदानाचा उत्साह; पुनर्विकास प्रकल्पाचीही चर्चा

मुंबईत ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’ने २० आणि २१ नोव्हेंबर रोजी ‘लोकशाही सवलत’ (डेमोक्रेसी डिस्काउंट) जाहीर केली आहे. मुंबईतील सॅसी स्पून – नरिमन पॉईंट, साझ कॅफे – लोअर परेल , ग्लोबल ग्रिल – मालाड, ओह सो सिली – खार, स्टेप्स कॅफे – वांद्रे , ग्रेट पंजाब- दादर यांसारख्या ५० हून अधिक मोठ्या हॉटेलमध्ये मतदान केलेल्या नागरिकांना मतदार ओळखपत्र आणि शाई लावलेले बोट दाखवल्यास खाद्यपदार्थांवर २० टक्के सवलत देण्यात आली. तर, मुंबईतील काही स्थानिक दुकानदारांनी आणि हॉटेल मालकांनीही उस्फुर्तपणे मतदारांसाठी १० ते २० टक्के सवलती जाहीर केल्या. मतदानानिमित्ताने अनेक दुकाने बंद असली तरी काही ठरावीक दुकाने सुरू होती. या दुकानांमध्ये देण्यात आलेल्या सवलतींच्या आकर्षणामुळे अनेक ग्राहकांनी दुकाने आणि हॉटेलमध्ये गर्दी केली होती. मतदानासाठी म्हणून एकत्र बाहेर पडलेल्या कुटुंबांनीही सवलत योजना असलेल्या उपहारगृहांकडे आपला मोर्चा वळवला.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : सोयी-सुविधांमुळे मतदान सुसह्य; मतदारांमध्ये मात्र निरुत्साह

‘शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि आपल्या देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित व्हावे हा या मोहिमेचा उद्देश होता’ असे एनआरएआयच्या मुंबई विभागप्रमुख रेचल गोएंका यांनी सांगितले.

आम्ही कपडे खरेदीवर ३० टक्के सवलत आणि आकर्षक भेटवस्तू ठेवल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविद्यालयात शिकणाऱ्या माझ्या मुलीने आपणही आपल्यातर्फे सहकार्य केले पाहिजे हे सुचवले होते, म्हणून यावेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदारांसाठी सवलतीत वस्तू उपलब्ध केल्या आहेत. – प्रशांत पांडे, सारा टेक्सटाईल, टिळक नगर

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी, संविधान दिन आणि मतदान दिनी खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांना ३०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू खरेदी केल्यास त्यावर १० ते २० टक्के सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आज दुकानात गर्दी केली. – विकास गुप्ता, बजरंग जनरल किराना स्टोअर, सानपाडा, नवी मुंबई</p>

लोकसभा निवडणुकीदरम्यान हा उपक्रम राबवण्यास आम्ही सुरुवात केली. त्यामुळे आजही मतदानाच्या दिवशी सवलतींचा लाभ घेण्यासाठी दुपारी जेवायला येणाऱ्यांची जास्त गर्दी होती. आम्ही कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता पैसे देण्याच्या वेळेस ग्राहकांच्या बोटावर निळी शाई असल्यास त्यांच्या जेवणाच्या बिलात १५ टक्के सवलत दिली. – दक्ष इंगवले, संतोष फॅमिली रेस्टॉरंट, वाकोला.