लोकसभा निवडणुकांच्या देशभरातील निकालाचे प्रतिबिंब मुंबईसह ठाणे आणि कल्याणमध्येसुद्धा पहायला मिळाले. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला पूर्णपणे नामोहरम करण्यात महायुतीच्या प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सपाटून मार खावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील दक्षिण-मध्य, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील जागांवर विजय मिळवत शिवसेनेने ही कसर भरून काढली. तसेच मुंबईतील उत्तर, उत्तर-मध्य आणि उत्तर-पूर्व मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केले. त्यामुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
त्याचप्रमाणे शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न असणाऱ्या ठाणे मतदारसंघात राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा पराभव केला. कल्याण मतदरासंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना धुळ चारत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २,५४,००० मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर दुसरीकडे भिवंडी आणि पालघर मतदारसंघात भाजपच्या कपिल पाटील आणि चिंतामण वणगा यांनी जवळपास लाखभराच्या मताधिक्यासह विजय संपादित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा