Mumbai Ring Road Project MMRDA Masterplan : मुंबई २४ तास जागी असते असं म्हटलं जातं. मात्र खरंच मुंबईकर २४ तास काम करत असतात का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. कारण, मुंबईकरांच्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा प्रवासात जातो. प्रत्येक मुंबईकर व मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, खोपोली नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार, इत्यादी ठिकाणी राहणारे लोक दररोज सरासरी दोन ते चार तास प्रवास करतात. मुंबईकर बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. दुसऱ्या बाजूला, कोलकाता आणि दिल्लीसारखं मेट्रोचं जाळं मुंबईत नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईकरांना चांगली वाहतूक व्यवस्था लाभलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी, त्यांचा प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एमएमआरडीएने (मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) खास योजना तयार केली आहे. इंडियन एक्सप्रेसने एमएमआरडीएच्या या खास योजनेची माहिती दिली आहे.

मुंबई ट्रॅफिक फ्री बनवण्याची रणनिती

मुंबई शहर ट्रॅफिक फ्री (वाहतूक कोंडीपासून मुक्त) करण्यासाठी एमएमआरडीएने ५८,५१७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण झल्यानंतर मुंबई केवळ वाहतूक कोंडीतून बाहेर येणार नाही तर मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत ९० किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं तयार केलं जाणार आहे. यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भूयारी मार्गांचा समावेश असणार आहे.

हे ही वाचा >> Mumbai Traffic Issue: मुंबईच्या वाहतूक समस्येवरचा उपाय; MMRDA नं मंजूर केले ५८ हजार कोटींचे प्रकल्प; पाच वर्षांत होणार मनस्तापातून सुटका?

मुंबईकर ५९ मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार

एमएमआरडीने तयार केलेल्या योजनेनुसार मुंबई व उपनगरांमध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत. हे सातही रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर ५९ मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतील. यासह मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे.

‘मिनिटांत मुंबई’ नेमकं काय आहे?

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले, या प्रकल्पांद्वारे मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. मुंबईकर एका तासाच्या आत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. आम्ही ही योजना मांडताना ‘मिनिटांत मुंबई’ असं म्हणतो याचा अर्थ मुंबईकरांना कुठेही जाण्यासाठी ५९ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लगता कामा नये.

हे ही वाचा >> मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : नवीन तारीख मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ, प्रचाराची रणधुमाळी शिगेला

मुंबई रिग रोड प्रकल्प (PC : TIEPL)

एमएमआरडीएने सांगितलं आहे की या योजनेद्वारे रस्त्यांचा विकास केला जाणार आहेच, यासह मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांवर जोर दिला जाणार आहे. सर्व योजनांवर मिळून तीन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एमएमआरडीए तयार करू पाहत असलेले सात प्रस्तावित रिंग रोड आपण नकाशांच्या माध्यमातून पाहुया.

पहिला रिंग रोड (PC : TIEPL)
दुसरा रिंग रोड (PC : TIEPL)
तिसरा रिंग रोड (PC : TIEPL)
चौथा रिंग रोड (PC : TIEPL)
पाचवा रिंग रोड (PC : TIEPL)
सहावा रिंग रोड (PC : TIEPL)
सातवा रिंग रोड (PC : TIEPL)

हे ही वाचा >> लिपिक पदाच्या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेची पुन्हा जाहिरात, प्रचंड विरोधानंतर ‘ही’ अट वगळली

रिंग रोड कोणत्या मार्गांवर बांधले जाणार?

प्रकल्पकुठून सुरू होणार?मर्ग
पहिला रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – कोस्टल रोड – वरळी – शिवडी कनेक्टर – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
दुसरा रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड – पश्चिम द्रुतगती महामार्ग
-पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
तिसरा रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – पश्चिम द्रुतगती महामार्ग – जेव्हीएलआर – कांजुरमार्ग जंक्शन – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
चौथा रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – गोरेगाव मुलुंड लिंक रोड – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
पाचवा रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – भायंदर फाउंटेन कनेक्टर – गायमुख घोडबंदर टनल – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर – साकेत फायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
सहावा रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – मीरा भायंदर लिंक रोड – अलिबाग विरार कॉरिडोर – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर साकेत फ्लायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
सातवा (आऊटर) रिंग रोडनरीमन पॉईंटनरीमन पॉईंट – वर्सोवा दहिसर भयंदर लिंक रोड – उत्तण लिंक रोड – वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे – अलिबाग विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर – अटल सेतू जेएनपीटी – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ring road 7 outer inner roads traffic free city mmrda masterplan 58517 crore asc