Mumbai road rage ऑडी कार मालकाने टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रोड रेजच्या ( Mumbai road rage ) प्रकरणात पोलिसांनी ऑडी मालकाला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ऑडी मालकाचं नाव रिषभ चक्रवर्ती असून तो पत्रकार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसंच या प्रकरणात त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ओला टॅक्सी चालकाला एक माणूस मारहाण करताना दिसत होता. सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत अनेक प्रतिक्रियाही आल्या आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

( Mumbai road rage ) या प्रकरणाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात हे दिसून येतं आहे की एक माणूस २४ वर्षांच्या ओला कॅब ड्रायव्हरला बाहेर काढून मारतो आहे. या ओला चालकाचं नाव कयामुद्दीन अन्सारी असं आहे. या घटनेमुळे कयामुद्दीनच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. ही घटना ( Mumbai road rage ) १८ ऑगस्टची आहे. या प्रकरणात आता रिषभ चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या दोघांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार

१८ ऑगस्टला नेमकं काय घडलं?

१८ ऑगस्टच्या रात्री कयामुद्दीन अन्सारी हा त्याच्या ओला टॅक्सीतून नवी मुंबईतल्या उल्वे या ठिकाणी प्रवासी ग्राहकाला घेऊन चालला होता. घाटकोपर येथील असल्फा मेट्रो स्टेशनजवळ एका ऑडीला त्याच्या टॅक्सीने पाठीमागून धडक दिली. आपल्या गाडीचं किती नुकसान झालं हे बघायला रिषभ चक्रवर्ती आणि त्याची पत्नी दोघंही खाली उतरले. त्यानंतर ऑडी कारचा मालक रिषभ चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष या दोघांनी चालकाला शिव्या देण्यास सुरुवात केली. रिषभ चक्रवर्तीने कयामुद्दीनच्या टॅक्सीला असलेला ओला कंपनीचा डिव्हाईसही काढून फेकला आणि कयामुद्दीनला मारहाण केली. व्हायरल व्हिडीओत हे दिसून येतं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

रिषभ चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

व्हायरल व्हिडीओतही रिषभ चक्रवर्ती हा ओला टॅक्सी चालकाला मारहाण करतोय हे स्पष्ट दिसतं आहे. जेव्हा त्याने कयामुद्दीनला उचलून खाली आपटलं तेव्हा कयामुद्दीनच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार रिषभ चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Story img Loader