मुंबई: मुंबईतील रस्त्यांची कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. त्या वेळी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा कामे आणि त्या अनुषंगाने केली जाणारी इतर कामे तसेच पावसामुळे रस्त्यांवर होत असलेले खड्डे भरण्यासाठी केली जाणारी कार्यवाही यांचा एकत्रित आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या वेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू तसेच अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीक्षणाचा खर्चदेखील कमी होतो. त्यामुळे मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत. मुंबईत आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचेही टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे.

२०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे, तर आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणदेखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.

यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करताना ठरावीक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डेदेखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळय़ात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेशदेखील करण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करताना महानगरपालिका प्रशासनाने नवीन निविदांमध्ये नावीन्यपूर्ण व महत्त्वाच्या अटींचा समावेश केला आहे.

त्याचप्रमाणे रस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये आणि प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) यांच्या कार्यालयालादेखील जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला या रस्त्यांवर थेट नजर ठेवता येणार असल्याचे ते म्हणाले.

४,९०० कोटींचा खर्च

सध्या २३६ किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे, तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित आहेत. शहरात ५० किलोमीटरच्या काँक्रीटीकरणासाठी ८०० कोटी, पूर्व उपनगरात ७५ किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी ६०० कोटी, तर पश्चिम उपनगरात २७५ किलोमीटरच्या काँक्रीटीकरणासाठी ३,५०० कोटी असा एकूण ४,९०० कोटींचा खर्च येणार आहे.

ठाण्यातील साकेत पूल खड्डेमुक्त : रस्ते विकास महामंडळाचा दावा

मुंबई : ठाण्यातील खड्डयांचा आणि त्याअनुषंगाने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला असतानाच ठाण्यातील महत्त्वाचा असा साकेत पूल आणि कशेळी पूल खड्डेमुक्त केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. सर्वाधिक खड्डे असलेले हे दोन पूल होते. येथील खड्डे बुजविण्यात आले असून वाहतूक कोंडी दूर झाल्याचा दावाही एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.

सध्या मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य आहे. खड्डयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एमएसआरडीसीला स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दोन्ही यंत्रणा खड्डे बुजविण्याच्या कामाला लागल्या. मागील दोन दिवसांत येथील सर्व खड्डे बुजविण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाण्यात सर्वाधिक खड्डे असून ते भरण्याचे मोठे आव्हान या दोन्ही यंत्रणांसमोर आहे. त्यातही साकेत पूल आणि कशेळी पूल हे सर्वाधिक खड्डे असलेले पूल म्हणून ओळखले जातात. मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील साकेत पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भिवंडी, कल्याण, जेएनपीए नाशिक आणि गुजरातला येण्यासाठी-जाण्यासाठी या पुलाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.

Story img Loader