मुंबई : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे मुंबईतील विद्यामान आमदारांची धावपळ सुरू झाली असून आमदार आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर भर देऊ लागले आहेत. त्याचबरोबर महापालिका स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी पालिका विभाग कार्यालय, मुख्यालयात आमदारांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार असून सप्टेंबर महिन्यापासून निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील विद्यामान आमदार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे पालिका स्तरावरील प्रश्न घेऊन आमदार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह महापालिका मुख्यालय, पालिकेच्या विभाग कार्यालयात येऊ लागले आहेत. फेरीवाला धोरणाची अंमबजावणी अनेक ठिकाणी सुरू झाल्यामुळे हा मुद्दा आमदारांनी उचलून धरला आहे.

हेही वाचा – कडोंमपातील ११८ हेक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण, कल्याणच्या तहसीलदारांची उच्च न्यायालयात माहिती

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात येऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. शेलार यांच्यासोबत भाजपच्या दहिसरमधील आमदार मनीषा चौधरी आणि मुलुंडमधील आमदार मिहीर कोटेचा हेही होते. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली. सागरी किनारा मार्गालगतच्या जाहिरात फलकाला विरोध करण्यासाठी ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी वरळीतील विविध प्रश्नांसबंधी पालिका आयुक्तांना सात पत्रे दिली आहेत.

मुंबईतील अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजित करणे, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे, विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे. पालिकेच्या ज्या धोरणांना नागरिकांचा विरोध आहे असे मुद्दे उचलून धरले जात आहेत. दहिसरची जागा धारावी प्रकल्पासाठी देण्याकरीता दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी विरोध केला होता. तर दहिसरमधील माजी आमदार विनोद घोसाळकर यांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.

हेही वाचा – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : उजव्या विचारसरणीच्या पाच आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

आंदोलने, बैठका

सध्या पालिकेकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच फेरीवाल्यांवर कारवाईदेखील सुरू आहे. त्यामुळे लालबागमधील फेरीवाल्यांनी साखळी आंदोलन सुरू केले असून आमदार अजय चौधरी हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. अंधेरी पश्चिममधील आमदार अमित साटम यांनीही प्रभागनिहाय पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांनीही गेल्याच आठवड्यात पालिका आयुक्तांची भेट घेऊन कुर्ला विभागातील विविध प्रश्न मांडले. कुर्ला स्थानकावरील सॅटिस प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.