मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात विनातिकीट प्रवाशांना पकडून १०४ कोटी रुपयांची दंडवसुली पश्चिम रेल्वेने केली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल, मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड केली जाते. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने विनातिकीट प्रवाशांना पकडून १०४.४५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात लोकलमधील विनातिकीट प्रवाशांकडून ३३.९८ कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा – संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली
हेही वाचा – आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
डिसेंबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह १.८९ लाख विनातिकीट प्रवाशांना शोध घेऊन त्यांच्याकडून १०.९८ कोटी रुपये वसूल केले. त्याशिवाय नोव्हेंबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ८५ हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ३.३५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आठ महिन्यात धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून ४५ हजार विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असेलल्या प्रवाशांना पकडून सुमारे १.५१ कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.