मुंबई : घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी चार आरोपींविरोधात सुमारे ३,३०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी आतापर्यंत १०२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे जबाब आरोपपत्राचा भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ७/११चा बॉम्बस्फोट खटला : आरोपींच्या अपिलांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ, नऊ वर्षांनंतर १५ जुलैपासून प्रकरणाची नियमित सुनावणी

याप्रकरणात इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे, इगो मीडिया कंपनीची माजी संचालक जान्हवी मराठे, जाहिरात फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व मान्यताप्राप्त स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक केली होती. त्या चौघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवध, गंभीर दुखापत, निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता त्याचा तपास गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक करीत असून १०२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai s ghatkopar hoarding collapse accident 3300 pages charge sheet filed mumbai print news css
Show comments