मुंबई : खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर जे. जे. रुग्णालयातील सर्व रुग्ण कक्ष अद्ययावत करण्यात येणार आहेत. अद्ययावत कक्षांची उभारणी पुढील वर्षापर्यंत करण्यात येणार असून त्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जे. जे. रुग्णालयातील चार रुग्ण कक्ष आणि तीन शस्त्रक्रियागृहांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात हे रुग्ण कक्ष रुग्णांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रुग्णालयातील अन्य कक्षांचे कामही हाती घेण्यात आले आहे. रुग्णालयातील मज्जातंतू शस्त्रक्रिया रुग्ण कक्ष, लहान मुलांचे कक्ष, औषध वैद्यकीय विभागाचा कक्ष आदींच्या अद्ययावतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. नूतणीकरणांतर्गत पूर्णपणे वातानुकूलित कक्ष उभारण्यात येणार असून, सध्या रुग्ण कक्षाची क्षमता ३० खाटांची असून, ती ४० ते ५० खाटा इतकी करण्यात येणार आहे. प्रत्येक खाटे शेजारी प्राणवायू पुरवठा करणारे यंत्र असणार आहे. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागामधील खाटांच्या क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जेणेकरून अतिदक्षता विभागात येणाऱ्या रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. अतिदक्षता विभाग हे मॉड्यूलर पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व यंत्रणांची रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्यात येणार असून, प्रत्येक खाटे शेजारी विद्युत यंत्रणेची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सर्व कामे पुढील वर्षांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला

हेही वाचा…मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रुग्णालयातील हृदयरोग विभागातील कक्ष प्रायोगिक तत्वावर अत्याधुनिक सोयी-सुविधा व सुखसोयींसह सुसज्ज करण्यात आला होता. जे.जे. रुग्णालयातील कक्षांच्या अद्ययावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रुग्णालयातील सर्व रुग्ण कक्षांचे वर्षभरात रुपडे पालटण्यात येणार आहे. जे. जे. रुग्णालयातील नूतनीकरणामुळे रुग्णालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना अधिक लाभ होईल.