मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मुंबई बलात्कार प्रकरणातील आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईतील धक्कादायक घटना; बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड
काय आहे प्रकरण –
शुक्रवारी मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे.
#UPDATE | A 30-year-old woman, who was found lying unconscious at Khairani Road in the Saki Naka area on 9th Sept after allegedly being raped, has died during the treatment at a city hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) September 11, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. महिलेवर उपचार सुरु होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरु असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला.